
निपाणी (वार्ता) : बांगला देशात अल्पसंख्याक हिंदू बांधवावर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या केली जात आहे. या हत्या तात्काळ थांबविण्यासह संबंधितावर कारवाई करण्याची मागणी येथील श्रीराम सेना कर्नाटक संघटनेने केली आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी मयमनसिंग जिल्ह्यातील भालूका येथे दिपू चंद्र दास या २७ वर्षीय हिंदू युवकाची जमावाने खोट्या आरोपावरून क्रूर हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद निपाणीत उमटले आहेत.तहसीलदार सुरेश मुंजे यांना यासंदर्भात विविध हिंदुत्ववादी संघटनां तर्फे निवेदन देऊन अत्याचार रोखण्यासाठी हस्तक्षेप करून त्यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली.
तहसीलदार सुरेश मुंजे यांनी, निवेदन स्वीकारून वरिष्ठ अधिकाराकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी निमगोंडा पाटील, अमोल चेंडके, राजेश आवटे, अजित पारळे व बबन निर्मले यांनी आपल्या मनोगतातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी शेखर पाटील, श्रवण कोळी, वैभव भाट, मायाप्पा राऊत, योगेश चौगुले, प्रभाकर पाटील, अभिमन्यू भिलगुडे, विक्रांत पोवार, आकाश मल्लाडे, महेश पाटील, संदीप जाधव, आकाश घाटगे, संभाजी रामनकट्टी, हर्षल लाटणे, नंदू बेल्लद, संतोष देवर्डेकर, अक्षय वाघेला, प्रशांत घोडके, रोहण पवार, प्रतीक गोईलकर, गिरीष अंकुशे, यश घुणके, मयूर शिंदे, आदित्य पलंगे, पार्थ डावरे, महेश मठपती, धनंजय कांबळे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे हिंदुत्ववादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta