
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील शाळा नियुक्ती व प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांची बेळगाव येथे स्तवनिधी येथील बाहुबली विद्यापीठ संचलित गुरुकुल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह बेळगाव जिल्ह्यातील आमदार अभय पाटील यांच्यासह गुरुकुल संस्थेचे उपाध्यक्ष राजू पाटील, संचालक प्रदीप पाटील, डॉ. संतोष चौगुले महावीर पाटील यांच्या उपस्थितीत भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी आमदार अभय पाटील यांच्यासह गुरुकुल संस्थेचे उपाध्यक्ष राजू पाटील, संचालक प्रदीप पाटील, डॉ. संतोष चौगुले महावीर पाटील हे उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत अनुदानित व अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक नियुक्ती प्रलंबित प्रकरणे, २०२० पर्यंतच्या रिक्त पदांची भरती, पदोन्नतीमुळे निर्माण झालेल्या रिक्तजागा, अतिथी शिक्षक नियुक्ती संदर्भातील तांत्रिक अडचणी चर्चा करण्यात आली.
शैक्षणिक कामकाजावर होणारा परिणाम टाळण्यासाठी शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शाळांच्या प्रस्तावांना तातडीने मान्यता देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी सर्व समस्या समजावून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. या भेटीमुळे निपाणी तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालक वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta