
निपाणी (वार्ता) : कर्नाटकाचे मंत्री यतीन्द्र सिद्धरामय्या यांनी आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ तीर्थक्षेत्राला शुक्रवारी (ता.२६) भेट दिली. यावेळी त्यांनी हालसिद्ध नाथांचे दर्शन घेऊन या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.
मंत्री यतीन्द्र सिद्धरामय्या यांनी बेळगाव येथील अधिवेशनाचे काम आटोपून निपाणीमार्गे आप्पाचीवाडी येथील तीर्थक्षेत्राला भेट दिली. यावेळी आप्पाचीवाडी येथील ग्रामपंचायततर्फे विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. आप्पाचीवाडी ग्रामपंचायतला इतर गावे जोडण्यात आल्याने निधीची कमतरता भासत आहे. त्यामुळे भविष्यात आप्पाचीवाडीसह दुसरी वेगळी ग्रामपंचायत निर्माण करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी केली. यावेळी यतीन्द्र सिद्धरामय्या यांनी सकारात्मक भूमिका घेऊन लवकर याबाबत निर्णय घेण्यात येईल. शिवाय आप्पाचीवाडी व परिसरातील कालव्यावरील पुलांची कामे तात्काळ पूर्ण करून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतला केले.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणरा चिंगळे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, सुजय पाटील, नवनाथ चव्हाण, विश्वास आबने, बाबुराव खोत, प्रकाश पुजारी, दत्ता पाटील, अण्णासाहेब बोते, सचिन खोत, धनाजी पोटले, किसन पोटले, आप्पासाहेब बोते, अण्णासाहेब बोते, बाळासाहेब कमते यांच्यासह निपाणी, आप्पाचीवाडी, कुर्ली परिसरातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta