
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील श्री सद्गुगुरु पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या यात्रेनिमित्त आयोजित रिव्हर्स तवेरा स्पर्धेत चेतन देवर्डे यांनी १० मिनिटात अंतर पार करून प्रथम क्रमांकाचे ५ हजार १ रुपयाचे बक्षीस पटकावले.
माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी यांच्या गाडीने १२ मिनिटे १३ सेकंदात अंतर पार करून द्वितीय क्रमांक पटकावून ३ हजार १ रुपयाचे बक्षीस मिळविले. तर रवींद्र पुंडे यांनी १४ मिनिटे ४३ सेकंदात अंतर पार करून तृतीय क्रमांकाचे २ हजार १ रुपयाचे बक्षीस मिळविले. येथील मराठी, कन्नड प्राथमिक शाळेच्या पटांगणात आयोजित शर्यतीचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे, माजी अध्यक्ष युवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी, तुषार पाटील, बाहुबली मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले सुमारे ६ तासाहून अधिक काळ चाललेल्या स्पर्धेत ५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून सी बी कोंडेकर, बी एस मलाबादे, बबलू शितोळे, किशोर सुतार, डॉ. मिलिंद कमते, धनाजी जाधव, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल मलाबादे, अमोल बसर्गे, अमोल रामनकट्टी, शैलेश गुजर, योगेश मलाबादे, मुनीर शेख, प्रवीण शिंदे यांनी परिश्रम घेतले. अक्कोळ येथे प्रथमच अशा स्वरूपाच्या स्पर्धा आयोजित केल्याने स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
Belgaum Varta Belgaum Varta