Tuesday , March 3 2026
Breaking News

कामगारांच्या हितासाठी विविध योजनांचा लाभ

Spread the love

 

मीनाक्षीताई पाटील ; अरिहंतच्या कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा

निपाणी (वार्ता) : दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांनी प्रत्येकाला आपलेसे मानून सहकार, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक जीवनात काम करताना प्रत्येकांच्या अडचणी सोडविल्या. संघर्षमय वाटचालीत खचून न जाता संकटांना सामोरे गेले. कोणताही स्वार्थ, पदाची अपेक्षा न करता विकासात्मक व शाश्वत कामांना प्राधान्य दिल्याचे मत मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले.
येथील अरिहंत को. ऑप. सोसायटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या.
मीनाक्षी पाटील म्हणाल्या, कला जिवंत राहून त्याचे महत्त्व आणखी वाढावे. सर्व कामगारांना एकत्र आणून कार्यक्रम करण्याचा दादांचा असलेला मानस आता पूर्ण झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारासाठी विविध योजना हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात मुख्य शाखेसह ६५ शाखांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गाणी, नाटक, ग्रुप डान्स, शायरी अशा कला सादर केल्या. कार्यक्रमास दिपाली पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, संस्थेचे संचालक सुभाष शेट्टी, पिरगोंडा पाटील, भुजगौडा पाटील, जयपाल नागावे, निर्मला बल्लोळे, राजू मगदूम, बाबासाब अफराज, संदीप पाटील, श्रीकांत वसवाडे, संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे, कृषी संघाचे सीईओ आर. टी. चौगुले, भरत गुंडे यांच्यासह संस्थेचे अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *