भाट गल्लीतील नागरिकांचा इशारा; नगरपालिकेने दुजाभाव केल्याचा आरोप
निपाणी (वार्ता) : शासकीय नियमाप्रमाणे नगरपालिकेला सर्व प्रकारचे कर प्रामाणिकपणे नागरिक भरत आहेत. त्यानुसार नगरपालिकेनेही आपल्या कर्तव्याची पूर्तता करीत मुलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. पण प्रशासनाने दुजाभाव करून अनेक वर्षांपासून रस्ते, गटारीसह इतर सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे आठवड्याभरात येथील रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास भाट गल्ली रस्ता कृती समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभाग क्रमांक २२ व २३ मधील भाट गल्लीतील रहिवाशांनी दिला आहे.
दिला आहे.
सुमारे २० वर्षांपासून भाट गल्ली येथे डांबरी रस्ता करण्यात झालेला नाही. शिवाय नगरपालीकेने अपुरा आणि अर्धवट रस्ता मंजूर केला होता. तोही निधी परत गेला आहे. येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वृध्द, अपंग, लहान मुलांना ये-जा करणे कठीण बनले असून यामुळे रस्त्यामुळे एका महिलेचा अपघात होऊन हात मोडला आहे. याउलट गल्लीतील रांगोळीचे कट्टेही तोडण्यात आल्याने नागरिकांना नुकसान सहन करावे लागले आहे. येथील गटारीची स्वच्छता राखण्यात येत नाही, विद्युत खांब धोकादायक बनले आहेत. नगरपालिका प्रशासनाने अर्धवट रस्ता त्वरीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यासह भागातील रस्ते बंद करण्यात येतील. पुढील परिणामांना प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असेही सांगण्यात आले. भाट गल्लीतील अर्धवट रस्ता गेला कुठे? रस्ता नाही; तर, मतदान नाही अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी वीणा भोसले, रेखा खाडे, बेबी बागवान, कला सांडुगडे, अक्काताई कांबळे, सिंधू तोडकर, कांचन पाटील आदी महिलांनी या भागातील समस्या मांडल्या. यावेळी भाट गल्ली रस्ता कृती समिती, शिवसंदेश युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta