Thursday , June 4 2026
Breaking News

सीमावासियांचे आधारवड भाई एन. डी. पाटील यांची पुण्यतिथी गंभीर्याने

Spread the love

 

बेळगाव : सीमावासियांचे आधारवड शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आपलं संपूर्ण आयुष्य सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी घातलेले, शिक्षण तज्ञ एन. डी. पाटील यांचा आज पुण्यतिथी आहे. सीमाप्रश्नाच्या चळवळीत आज क्षणोक्षणी एन. डी. पाटीलाची आठवण जाणवते. एन डी पाटलांच्या एका शब्दाखातर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते एकवटत असत त्यांच्या जाण्याने सीमावासिया पोरके झाले आहेत. त्यांचा स्मृतिदिन हा सीमाभागातील पहिल्या सत्याग्रहाच्या वेळी आहे. आणि हा योगायोग त्यांच्या सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीबद्दल असलेला तळमळीबद्दल असावा, असे विचार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले.

शनिवार दिनांक 17 रोजी कॉलेज रोडवरील बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयामध्ये डॉ. एन डी पाटील यांची पुण्यतिथी गांभीर्याने पाळण्यात आली.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस मोनाप्पा संताजी यांनी प्रास्ताविक केले. यानंतर माजी आमदार मनोहर किनेकर व लक्ष्मण होणगेकर यांच्या हस्ते एन डी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर, अनिल पाटील, मेगो बिर्जे, महादेव बिर्जे, दीपक पावशे, नारायण सांगावकर, आप्पासाहेब कीर्तने, संजय पाटील आदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *