Tuesday , March 3 2026
Breaking News

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत

Spread the love

 

ॲड.निलेश हत्ती; श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे बैठक

निपाणी (वार्ता) : देशातील हिंदू बांधव आणि धर्मावर वारंवार अन्याय अत्याचार सुरू आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे विविध उपायोजना केल्या जात आहेत. यापुढे काळातील हिंदू बांधव व धर्मावर अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्रित यावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष ॲड. निलेश हत्ती यांनी केले. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे येथील संत वाल्मिकी ऋषी मंदिरात आयोजित हिंदू बांधवांच्याच्या मेळाव्यात ते बोलत होते.
​हिंदू धर्मावरील अन्यायाबाबत गेल्या आठवड्यापासून जनसंपर्क अभियान राबविण्यात आले त्यानंतर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्षभरात संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा चित्रफीतीद्वारे दाखवण्यात आला. देशात बांगलादेशी घुसखोर, रोहींग्या व पाकिस्तानी घुसखींरीचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी त्यांना बाहेर काढून आपला परिसर भयमुक्त करण्याचे आवाहन शासनाला करण्यात आले. याशिवाय युवकांनी व्यसनाधीनता सोडून हिंदू धर्म वाढविण्यासह व्यवसायाकडे लक्ष देण्यात बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण अध्यक्ष संदीप मोहिते यांनी प्रास्ताविक केले. नवलीहाळ येथील शिवशंभो मर्दानी आखाड्याचे पवन वाडकर, श्रेयस आंबले, अनिल भिलुगडे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस विनायक शेटके, प्रशांत केस्ती, अभिजीत सुगते, किरण रायकर, वैभव पाटील, प्रशांत खराडे, कुणाल पाटील, योगेश कोठीवाले, लखन सुतार, सिद्धार्थ कदम, विपुल सुतार, साई खोत, हर्षल पोतदार, भरत शिंदे, रोहित पाटील, रोहित गुरव, श्रीनिवास चव्हाण, दीपक भांबुरे, विभावरी भांबुरे, सपना भांबुरे, अनुराधा साळुंखे, सरिता बागडे, वर्षा आंबले यांच्यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. निहाल चराटे यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *