शेतकरी गुंतला पक्षापासून पिकाच्या संरक्षणात
निपाणी (वार्ता) : यंदा मुबलक झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातारणामुळे गायब झालेली थंडी परतली आहे. रब्बीतील पिकांना याचा चांगलाच लाभ होत आहे. तालुक्यात यंदा ज्वारीचे बंपर पिक बहरले असून पोटरीत आलेल्या कणसामध्ये दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
थंडी व पोषक वातावरणामुळे यंदा ज्वारीच्या उत्पादनात भरमसाठ वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
निपाणी भागातील ज्वारीची चव सर्वदूर लोकप्रिय आहे. सध्या ज्वारीचे पीक जोमात आले आहे. केवळ अन्नधान्याचा नव्हे तर गुरांच्या उन्हाळ्यातील चाराऱ्याचही प्रश्नही मार्गी लागणार आहे. तालुक्यात सोयाबीन, ऊस, तंबाखू पिक जास्त प्रमाणात घेतले जाते. त्याच प्रमाणे रब्बी हंगामातही ज्वारीचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांत खाना मिळणारा दर लक्षात घेता ज्वारीचे क्षेत्र कमीच झाले होते. कोरडवाहू जमिनी असलेल्या शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन या पिकानंतर ज्वारीची पेरणी केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना ज्वारी आणि गहू ही दोन्ही पिके दिलासा देणारीच आहेत. यंदा ज्वारीचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत वाढला. मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसाने आणि योग्य वेळी वाढलेल्या थंडीमुळे ज्वारीची कणसे आता भरात आली आहेत. काही ठिकाणी पोटऱ्यात आलेली ज्वारी लहरताना दिसत आहे.
——————————————————————-
‘पक्ष्यांच्या थव्यांपासून संभाव्य ज्वारीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधव विविध उपाययोजना करत आहेत. पिकाच्या भोवती पक्षी प्रतिबंधक पट्टी बांधण्यासह सकाळच्या सत्रात पक्षापासून पीक वाचवण्यासाठी गोफणीचा वापर, शेतात मचा बांधणे आदी कामांचे नियोजन शेतकरी करीत आहेत.’
-संजय कोपार्डे,
युवा शेतकरी, बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta