निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय, प्राथमिक, माध्यमिक विभाग आणि वेंकटेश्वरा पदवी पूर्व महाविद्यालयातर्फे ‘कलाविष्कार २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ए.सी. धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, संस्थेचे सचिव विक्रमादित्य धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे, मराठा बँकेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, सचिन पवार उपस्थिती होती.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थेचे संस्थापक प्रा. चंद्रहास धुमाळ यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विनायक बाचणे यांनी स्वागत केले. एम.डी. खोत यांनी वार्षिक अहवालाचे केले. माध्यमिकचे मुख्याध्यापक एस. एस. पचंडी, एस. आर. संकपाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेसाठी दररोज ने- आन करणाऱ्या १२ रिक्षा चालक, माजी नगरसेवक मज्जिद सय्यद, निपाणी रायडर्स ग्रुपचे आकाश भोसले,निपाणकर झोनचे आदर्श भोपळे व प्रेमकुमार भोसले यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. लक्ष्मण चिंगळे यांनी, जिद्द व चिकाटीच्या आधारे यश संपादन करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन शाळेचे नाव उज्वल करण्याचे आवाह केले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये लावणी, भजन, कीर्तन, नाटक, कोळीगीत, भक्तीगीते, भरत नाट्य व फिल्मी गाणी अशा विविध कलागुणांचे कार्यक्रम सादर केले. एस. के. जोशी यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. एम. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta