Tuesday , September 17 2024
Breaking News

राजकीय पाठबळ नसताना केलेले कार्य उल्लेखनीय

Spread the love

आमदार लखन जारकीहोळी : स्तवनिधीत सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कोणतेही राजकीय पाठबळ नसताना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून युवा नेते उत्तम पाटील यांनी सहकार सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. सामाजिक बांधिलकी जपत महापूर, अतिवृष्टी आणि कोरोना काळात अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानरुपी आशीर्वाद देऊन त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन विधानपरिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी केले. बोरगाव येथील नूतन नगरसेवक, विधानपरिषद सदस्य लखन जारकीहोळी आणि युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तवनिधी येथे गुरुवारी (ता.३) आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
आमदार जारकीहोळी म्हणाले, उत्तम पाटील यांनी मरगळलेल्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत निपाणी मतदारसंघातील २० ग्राम ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. नगरपंचायतीमध्ये विरोधकांना आपले खातेही खोलू दिलेले नाही. भविष्यात तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुका आहेत. त्यावेळीही अशाच प्रकारे उत्तम पाटील यांच्या पाठीशी राहूश त्यांना सहकार्य करावे. निपाणी मतदार संघावर आपले विशेष लक्ष असून कार्यकर्त्यांनी एकजुट राखून विधानसभेच्या तयारीला लागावे.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप १३ महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. यशाला अनेक जण तर अपयशाला कोणी नसतात. त्यामुळे या निवडणुकीची तयारी हळूहळू करावी लागणार आहे. त्यामुळे दमदार वाटचाल होत असल्याचा आपला अनुभव आहे. वरिष्ठ नेते मंडळीसह सहकार रत्न रावसाहेब पाटील व युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार उत्तम पाटील यांनी राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे. आयुष्यात आपण दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सर्व नेते मंडळींना एकत्रित आणण्याची जबाबदारी आपली असून त्यानंतर राजकीय वाटचाल ठरविता येईल. अथक मतदारसंघात नवीन घडवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवा नेते उत्तम पाटील यांनी, आपण सामान्य कार्यकर्ता असून मतदारांनी मतदान रुपी दिलेले प्रेम महत्त्वाचे आहे. सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी अनेकांना नेतेपद मिळवून दिले होते. त्यांच्यासह युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपली राजकीय वाटचाल सुरू आहे. कार्यकर्ता हाच आपला पक्ष असून त्यांच्या जिवावरच पुढील सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी जारकीहोळी कुटुंबीयांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. आतापर्यंत सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून काढण्यात आपण यशस्वी झालो आहोत. विधान परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही भरघोस यश मिळवले आहे. यापुढील काळातील मतदारांनी अशाच प्रकारे सहकार्य करावे.
यावेळी अशोककुमार असोदे, साक्षी पाटील, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, नगरसेवक शेरु बडेघर, अकोळ ग्रामपंचायत उपाध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे, के. डी. पाटील, सुनील पाटील- भोज यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी व्यासपिठावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. उमेश पाटील यांनी स्वागत केले. यावेळी केक कापून उत्तम पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर विधानपरिषदेवर निवडून आल्याबद्दल आमदार लखन जारकीहोळी व वाढदिवसानिमित्त उत्तम पाटील यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास प्रा. डॉ. अच्युत माने, नगरसेवक संजय सांगावकर, दत्ता नाईक, शौकत मनेर, संजय पावले, दीपक सावंत, नगरसेविका अनिता पठाडे, बोरगावचे नगरसेवक अभय मगदूम, प्रदीप माळी, रोहित पाटील, दिगंबर कांबळे, माणिक कुंभार, सुंदर पाटील, सतीश पाटील, महेश पाटील, अमोल नाईक, संजय स्वामी, चेतन स्वामी, उदय पाटील, राहुल पाटील, रोहन भिवसे, दत्तकुमार पाटील, शंकरदादा पाटील, राजू पाटील-आकोळ, निरंजन पाटील, गजानन कावडकर, अरुण निकाडे यांच्यासह निपाणी मतदारसंघातील विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. इम्रान मकानदार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *