माजी मंत्री वीरकुमार पाटील ; स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरासह कुपनलिकेची खुदाई
निपाणी (वार्ता) : येथील दौलत मळा मधील रहिवासी हिमांशू पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रूढी, परंपरेला फाटा देऊन रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आणि कूपनलिकेची खुदाई करून समाजाला वेगळी दिशा देऊन दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अशा उपक्रमाची सध्याच्या काळात गरज आहे. मानवी रक्ताशिवाय पर्याय नसल्याने युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे. त्यासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील, असे मत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
रविवारी ( ता.१) हिमांशू उर्फ शशांक पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पहाटे आंदोलन नगरातील स्वामी समर्थ मंदिरात पूजा अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांची पाण्याची अडचण लक्षात घेऊन पाटील परिवारातर्फे कूपनलिकेची टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांच्या हस्ते खोदाई करण्यात आली.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते हिमांशू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. माजी नगरसेवक नगरसेवक विलास गाडीवरड्डर, बाळासाहेब देसाई -सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सभापती डॉ. जसराज गिरे, डॉ.सदानंद पाटणे यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले. रक्तदान शिबिरात ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांना दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनतर्फे भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले. नेत्र तपासणी शिबिरात १०० पेक्षा रुग्णांची तपासणी करण्यात आली.
दौलतराव पाटील मळा ग्रुप, निकु पाटील मित्रपरिवार, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी स्वामी समर्थ मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास, सहकाररत्न उत्तम पाटील,सुजय पाटील, संदीप चावरेकर, वसंत धारव, रवींद्र इंगवले, शशी पाटील, रवींद्र श्रीखंडे, गोपाळ नाईक, माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, सुरेश घाटगे, रमेश भोईटे, राजू पाटील, इंद्रजीत माडेकर, कृष्णात कुंभार, विनोद बल्लारी, सागर पाटील, संदीप इंगवले, स्वप्निल उर्फ छोटू पावले, अनिल श्रीखंडे यांच्यासह दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—
नेत्रदानाचा संकल्प
दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित नियंत्रित तपासणी शिबिरात निवृत्त प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मारणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta