Monday , September 21 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळ व हलगा ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळ व हलगा ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या निधनामुळे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता मरगाई मंदिर परिसरात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा सामजी होते. यल्लाप्पा सामजी यांच्या हस्ते अजित दादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मराठा समाज सुधारणा मंडळाच्या सदस्यांच्या वतीने अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मनोहर संताजी, भुजंग बिळगोजी, यल्लाप्पा सामजी यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी शिवाजी संताजी, पियुष मोरे, संभाजी संताजी, कुमार जाधव, सुशांत बिळगोजी, निलेश संताजी, दयानंद शिंदे, धाकलू बिळगोजी, गोरप्पा मोरे, व हलगा ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *