Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावच्या मयांक हलदर याने दोन सुवर्णपदकांना घातली गवसणी

Spread the love

 

बेळगाव : चेन्नई येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन आयोजित जलतरण स्पर्धेत ज्यामध्ये भारतासह इतर दहा देशातील जलतरपटूंनी भाग घेतला त्यामध्ये बेळगावच्या मयांक हलदर याने भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली. त्याने 50 मीटर फ्रीस्टाइल सुवर्णपदक व 25 मीटर बॅक स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक मिळवून बेळगावचे नाव संपूर्ण देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकविले याबद्दल आबा स्पोर्ट्स क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब, क्रीडा भारती बेळगाव यांच्यातर्फे त्याचा बेळगाव रेल्वे स्टेशनवर आगमनाच्या वेळेला सन्मान करण्यात आला. यावेळी मयांकचे आई-वडील तसेच आबा स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार, विशाल वेसने, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, सुधीर धामणकर, मोहन पत्तार, सूर्यकांत हिंडलगेकर, पद्मप्रसाद हुली, गणेश दडीकर, हर्षाली पाटील, अनंत पाटील व इतर मान्यवर क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *