Sunday , July 26 2026
Breaking News

नोकरीवालाच मुलगा पाहिजे ही मानसिकता बदला : महापौर मंगेश पवार

Spread the love

 

बेळगाव : नोकरीवालाच मुलगा पाहिजे ही मानसिकता बदलायला हवी, असे आवाहन महापौर मंगेश पवार यांनी केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे वधू-वर महामेळाव्यात मंगेश पवार प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, बांधकाम व्यावसायिक अमर अकनोजी, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, वधू- वर मंडळ प्रमुख ईश्वर लगाडे व खजिनदार के. एल. मजूकर उपस्थित होते.
मराठा समाजातील लग्ने वेळेवर लावा व मुलामुलींची पत्रिका बघण्यापेक्षा त्यांचे कर्तृत्व बघा असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
अवाढव्य अपेक्षा न बाळगता तडजोडीची भूमिका घ्यावी तसेच पॅकेजपेक्षा मुलांचे योग्य गुण पहा असे आवाहन श्री. मरगाळे यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्री. पवार यांनी यांनी पुष्पहार अर्पण केला तर कै. नारायणराव जाधव यांच्या तसबिरीचे पूजन श्री. अकनोजी यांनी केले. यावेळी वधू- वर मंडळाचे ईश्वर लगाडे, के. एल. मजूकर, संग्राम गोडसे, राजू पावले, सुरेन्द्र जाधव, कविता देसाई यांनी वर्षभर केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
सुरवातीला शिवराज पाटील यांनी स्वागत केले तर ईश्वर लगाडे यांनी वधू -वर मंडळाचा आढावा घेतला. संग्राम गोडसे यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन के. एल. मजूकर यांनी केले.
यावेळी कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, धारवाड व बंगलोर येथून वधू वर व पालक उपस्थित होते.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ बांडगी, प्रकाश गडकरी, संदीप मुतगेकर, सुनिल लगाडे यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *