Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीतील शेट्टी सराफांनी बनविली गुलबर्ग्यातील अनवीर भद्रेश्वर देवाची २० किलोची चांदीची पालखी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अशोक नगरातील अप्पय्या शिवरुद्राप्पा शेट्टी यांच्या सराफ दुकानात गुलबर्गा जिल्ह्यातील अनवीर भद्रेश्वर देवालयातील २० किलो ४१० वजनाची पालखी बनविण्यात आली आहे. त्यासाठी १५ कारागीरांनी तीन महिने परिश्रम घेतले आहेत. ही पालखी आकर्षक झाल्याची माहिती देवस्थानचे पृथ्वीराज पाटील, सिद्धलिंग क्षेमशेट्टी यांनी सांगितले.
चांदीची पालखी बनवण्यासाठी भाविक आणि देवस्थान कमिटी कडून २२ किलो चांदी देण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यापासून त्यापासून पालखी बनवण्याचे काम सुरू होते. कारागिरांनी त्यावर आकर्षक कलाकुसर केली आहे. महाशिवरात्र निमित्त आयोजित सोहळ्यात या पालखीचे उद्घाटन होणार आहे. ही पालखी मंगळवारी (ता.३) देवस्थान कमिटीकडे सुपूर्द करण्यात आली. ही पालखी बनवण्यासाठी ३ लाख रुपयांची मजुरी देण्यात आली आहे. सुरेश शेट्टी व रवींद्र शेट्टी यांनी, आपल्या सराफ दुकानातआतापर्यंत चांदीच्या १५ मोठ्या पालख्या आणि रथ बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये येडूर येथील रथाचा समावेश आहे. सध्या बदामी येथील बनशंकरी देवाचा २०० किलो चांदीचा रथ बनविला जात आहे. सध्या त्यावर आकर्षक कलाकुसरीचे काम सुरू आहे.
पालखी वितरण प्रसंगी आदित्य शेट्टी, कार्तिक शेट्टी, सिद्धलिंग क्षेमशेट्टी, पृथ्वीराज पाटील, संतोष जिरली, रुद्राप्पा जिरली, प्रज्वल जिरली, विनायक जिरली, आनंद जिरली, दीपक पाटील दर्शना जिरली यांच्यासह देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *