Sunday , September 8 2024
Breaking News

सैन्य दलासाठी सृजनशीलता, नेतृत्वगुण आवश्यक!

Spread the love

कर्नल विलास सुळकुडे : देवचंदमध्ये छात्रांचा सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : छात्रांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतोय, असे न म्हणता दृढनिश्चय पूर्वक ‘मी यशस्वी होणारच’ असे ठामपणे सांगितले पाहिजे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी दुसरा पर्यायच उरत नाही. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, बी. एस. एफ., सी आर पी एफ, आय सी एस एफ, आय. टी. बी. पी., यासारख्या केंद्रीय सुरक्षा दला बरोबरच राज्यातील पोलिस, राज्य राखीव पोलीस दल, अग्निशामकदल, सुरक्षा दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल इत्यादीमध्ये असणाऱ्या नोकरीच्या संधी, त्याकरिता आवश्यक पात्रता, परीक्षेची रचना, व त्याची तयारी करावी. मुलांनी सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे, असे मत कोल्हापूरचे माजी विद्यार्थी व पॉलिक्लिनिक प्रशासनाधिकारी कर्नल विलास सुळकुडे यांनी व्यक्त केले.
छात्रसेना व्हाईट आर्मी आणि देवचंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या छात्र सैनिकांचा सदिच्छा समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल सुळकुडे होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एम. एम. बागवान होते.
सुळकुडे म्हणाले, लेखी परीक्षा बरोबरच एस. एस. बी. ची तयारी करणे गरजेचे आहे. कारण या पदासाठीच पाच दिवस मुलाखत चालते. यासाठी छात्राच्या गुणांची टक्केवारी महत्त्वाची नसून सृजनशीलता, प्रामाणिकपणा, नेतृत्वगुण, मनोविकास आदी जीवन कौशल्यांचा प्रामुख्याने विचार होतो.
पाहुण्यांचा सत्कार उपप्राचार्य डॉ. एम. एम. बागवान यांनी स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. ज्युनियर अंडर ऑफिसर सुष्मा खवरे यांचा ‘बेस्ट कॅडेट २०२२ अवार्ड देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला.
प्रथम सत्रात सकाळी सत्रात फणी गेम्स, मनोरंजन खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छात्रसेना विभाग प्रमुख मेजर डॉ. अशोक डोनर यांनी प्रास्ताविक केले. कॅडेट तेजश्री पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
मयूर मोकाशी, सुष्मा खवरे, नेहा पाटील, प्रतीक भिलारे, सार्जंट वैष्णवी नलवडे यांनी छात्रसेनेमुळे व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. कार्यक्रमास उपप्राचार्य एस. जी. कागवाडे, पर्यवेक्षक ए. डी. पवार, थर्ड ऑफिसर शिवानंद चौगुले, एस. एस. डांगरे, हवालदार पवार, छात्रसैनिक, व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक उपस्थित होते. कॅडेट प्रतीक्षा चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. पी.पी. शाह, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशीषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह, ५६ महाराष्ट्र बटालीयनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. एस. सयाना, प्रशासकीय अधिकारी कर्नल विजयंत थोरात व सुभेदार मेजर विलास रामगुडे, कॅडेट विक्रम भोसले, सानिका भगत, शुभम चव्हाण, ओंकार खोत, मयुरी चौगुले, राणी गुरव, मानसी हवालदार, सृष्टी पाटील, निरंजन पाटील, अमित कांबळे, साक्षी चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
—-

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *