Tuesday , March 3 2026
Breaking News

महालक्ष्मी मंदिरासह दिगंबर जैन मंदिरास रमेश कत्ती, उत्तम पाटील यांची सदिच्छा भेट

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा वास्तुशांती आणि कळसारोहण सोहळा पार पडला आहे. याशिवाय त्रैवार्षिक यात्रेला प्रारंभ झाला असून त्या पार्श्वभूमीवर या भक्तीमय सोहळ्यास माजी खासदार रमेश कत्ती, सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्याशिवाय बस्ती गल्लीतील १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरासही भेट देऊन दर्शन घेतले.
नूतन श्री महालक्ष्मी मंदिरातील दर्शनानंतर श्री महालक्ष्मी देवस्थान व अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष शआशिषभाई शहा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी आशिषभाई शहा यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा व सत्कार करण्यात आला. रमेश कत्ती आणि उत्तम पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या भक्तिमय आणि आत्मीय प्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा सन्मान राखत एकतेचा व श्रद्धेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याचे सांगितले. यावेळी
विद्या संवर्धक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, ॲड. संजय शिंत्रे, संचालक रामगोंडा उर्फ पप्पू पाटील यांच्यासह महालक्ष्मी यात्रा कमिटीचे पदाधिकारी, विविध संघ, संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी नगरसेवकांसह भाविक उपस्थित होते.
येथील बस्ती गल्लीतील श्री १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरसही माजी खासदार रमेश कत्ती, उत्तम पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी बस्ती कमिटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बस्तीचे माजी अध्यक्ष सुधाकर खोडबोळे, अध्यक्ष अरुण खोडबोळे, उपाध्यक्ष अमर उत्तुरे यांच्यासह संचालक, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी, वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर; सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक फिरोज चाऊस

Spread the love जागतिक वन्य दिन विशेष जनजागृतीसह शिकार थांबवणे गरजेचे निपाणी (वार्ता) : जैवविविधतेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *