Monday , September 21 2026
Breaking News

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत सूर्यवंशी, चौगुले प्रथम

Spread the love

 

शांतिनिकेतन शाळेतर्फे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन कन्नड, मराठी माध्यम शाळा, शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदेव श्री १०८ संमतभद्र महाराज महाराज यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कुमोदीनी चौगुले यांच्या स्मरणार्थ अंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. अध्यक्षस्थानी स्तवनिधी येथील गुरुकुल आश्रमाचे संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी, डॉ. अनिल ससे, हायस्कूलचे अध्यक्ष कपूरचंद इंगळे, संचालक मिलिंद चौगुले, सेक्रेटरी प्रदीप पाटील उपस्थित होते. स्पर्धेत प्राथमिक गटात सौंदलगा येथील रिद्धी सूर्यवंशी आणि माध्यमिक गटात कन्या शाळेच्या समीक्षा चौगुले हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभाग गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. प्राथमिक गटातपल्लवी जाधव- एम टी.ई. मराठी स्कूल सांगली आणि देवराज सुरेश पाटील- मोहनलाल जोशी विद्यालय -अर्जुननगर यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटाततजिला नायकवडी -मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी आणि श्रेया मगदूम- शांतिनिकेतन हायस्कूल, निपाणी यांनी द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचे परीक्षक म्हणन जे. डी. कोरडे, सुनील कांबळे त्यांनी काम पाहिले.
मुख्याध्यापिका अलका भोसले यांनी स्वागत केले.महावीर पाटील, यांनी सध्याची परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांच्या सानिध्यात र राहुन अभ्यासात प्राविण्य मिळविण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे संचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. जितेंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *