Monday , September 21 2026
Breaking News

रमजान महिन्यात मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी नगरपालिका आयुक्तांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना बुधवारपासून (ता.१८) सुरू होत आहे. या काळात शहर आणि उपनारातील अनेक मुस्लिम बांधव रमजानचा रोजा करतात. त्यामुळे या काळात नगरपालिका प्रशासनाने सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छतेसह इतर मूलभूत सुविधा पुरवण्याच्या मागणीचे निवेदन माजी सभापती जुबेर बागवान यांनी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना शनिवारी (ता.७) दिले.
निवेदनातील माहिती अशी, शहराबाहेर असलेल्या बागवान गल्ली परिसरात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. गल्ली जवळच बागवान ओढा असून तो प्लास्टिक कचरा व इतर साहित्यामुळे अस्वच्छ बनला आहे. त्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय परिसरात डासांचा प्रादुर्भाव ही वाढला आहे. त्यामुळे रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच त्या ओढ्याची जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या साह्याने स्वच्छता करावी. शिवाय बागवान गल्ली व इतर ठिकाणी औषध फवारणी करावी. डांसाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आठवड्याला फॉगिंग मशीनने औषध फवारणी करावी. यासाठी महिनाभर या भागात सफाई कामगारांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
रमजान रोजा साठी मुस्लिम समाज बांधव पहाटे चार वाजता नमाज अदा करतात. या काळात हिदायतनगर, मुगळे गल्ली, तवटे गल्ली, बागवान गल्ली, दर्गाह परिसरात स्वच्छ आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा. नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी निवेदन स्वीकारून रमजान काळात मूलभूत सुविधा पुरविण्याची ग्वाही दिली.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *