सकाळी नऊ वाजल्यापासूनच गर्दी : तीन दिवसानंतर उघडल्या बँका
निपाणी (संजय सूर्यवंशी) : गेल्या महिन्यापासून शहर आणि ग्रामीण भागात रुग्णांनी मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालय, मेडिकल, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. तब्बल पाच दिवसानंतर बँका उघडल्यावर शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती. सलग तीन दिवस बँका आणि पतसंस्था बंद असल्याने ग्राहकांची या काळात मोठी धावपळ उडाली. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल असून इतर कामासाठी रक्कमची मोठी अडचण भासली. परंतु या काळात अनेकांनी उसनवार करून आपल्या रकमेची गरज भागवली. त्यामुळे सोमवारी रकमेसाठी शहरातील सर्वच बॅंका समोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सोशल डिस्टन्स हरवलेले दिसत होते. विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांसह शहर आणि ग्रामीण भागातील अनेक ग्राहक आणि महिन्यातील पहिला आठवडा असल्याने विधवा अपंग संध्या सुरक्षा अशा वेतनासाठी नागरिक सकाळी नऊ वाजता बँकेजवळ येऊन बसले होते. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत विविध बँकांच्या आधारात ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करीत होते तरीही गर्दी वाढत असल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत होता.
तीन दिवसानंतर एटीएम सुरू
बँका बरोबरच प्रशासनाने शहरातील एटीएमवरही निर्बंध लादले होते. त्यामुळे सलग तीन दिवस एटीएम बंद असल्याने सर्वांनाच आर्थिक चणचण भासली. बँका सुरू झाल्यानंतर सकाळी 11 नंतर सर्वच एटीएम केंद्रात रक्कम भरल्याने रक्कम काढण्यासाठी नागरिक दुपारपर्यंत शहरात येत होते.