
निपाणी (वार्ता) : यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांनी उस लागवडीकडे कल वाढवला आहे. मात्र ऊस पिकावर अचानक केवडा रोगासह नोकरी माव्याचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उसाची पाने पिवळी पडण्यासह वाढ खुंटत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. नांगरणी, रोटर, पलटी, सरी सोडणे अशी मशागत करून नवीन वाणांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय महागडी खते व औषधांची फवारणी करूनही पिकावरील केवडा आणि लोकरी माव्याचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. केवडा रोगामुळे ऊस पीक पिवळे होऊन वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. केवडा रोगामुळे ऊस पीक उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच संबंधित कृषी विभागाने तातडीने पाहणी करून मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
लागवडीवेळी जमिनीत चुनखडीयुक्त
फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रत्येक एकरी १० किलो मात्रा शेण खतात मिसळून द्यावी. उभ्या पिकात केवडा आढळत्यास ५०० ग्रॅम फेरस सल्फेट + ५०० ग्रॅम झिंक सल्फेट + २ किलो युरिया + १०० लिटर पाणी या मिश्रणाच्या दोन ते तीन फवारण्या केल्यास केवडा रोग आटोक्यात येत असल्याचे कृषी अधिकारी दीपक कौजलगी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta