
दोन दिवस चालणार सोहळा; आणखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील साई शंकर नगर मधील साई मंदिरात शुक्रवारपासून (ता.१३) साई यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार अखेर चालणाऱ्या या कार्यक्रमात पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरू साईनाथ विश्वस्त मंडळ व साई यात्रा कमिटीने दिली आहे.
शुक्रवारी (ता.१३) पहाटे साईबाबांची काकडा आरती, सकाळी ६ वाजता साई मूर्तीस डॉ. अभिषेक माने व डॉ. प्रियांका माने यांच्या हस्ते, अभिषेक, महापूजा व आरती ९ ते ११ रुद्राभिषेक, ११ ते १२ साईबाबांचा पालखी सोहळा, दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती झाल्यावर हळदी-कुंकू व हालसिद्धनाथ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता अजित मेहता व सुवर्णा मेहता यांच्या हस्ते धुपारती व रात्री १० वाजता शेजारती होईल. शनिवारी (ता. १४ रोजी पहाटे काकड आरती, सकाळी डॉ. जोतिबा चौगुले व डॉ. राजश्री चौगुले यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा, ९ ते ११ पर्यंत साई स्तवन मंजिरीचे सामूहिक पारायण, ११ वाजता प्राणलिंग स्वामींचे आशीर्वचन, १२ वाजता मध्यान्ह आरती झाल्यावर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता नागराळ येथील शिवलिंगेश्वर शिव भजनी मंडळ, निपाणीतील साई महिला भजनी मंडळ, वीरभद्र महिला भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी अमृतानंद महाराजांचे प्रवचन, भजन सेवा, सायंकाळी ६ वाजता सुभाष देसाई यांचे व्याख्यान, ७ वाजता धुपारती, ७.३० वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम व रात्री १० वाजता शेजारती होणार आहे. या सोहळ्याचा साईभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सद्गुरू साईनाथ विश्वस्त मंडळ व साई यात्रा कमिटीने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta