

निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे श्री मलकारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त मुख्य मंदिरात आयोजित पालखी मिरवणुकीचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी
दीपक पाटील (वसगडेकर) आणि सचिन चौगुले यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले.
सोमवारी (ता.१६) मुख्य मंदिरात देवाची विधिवत पूजा करून रुद्राभिषेक, बिल्वार्चण, महाअभिषेक व पूजा बांधण्यात आली.
सजविण्यात आलेल्या पालखीची मानकरी कुलकर्णी व गाव कामगार पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आले. दीपक पाटील( वसगडेकर) व सचिन चौगुले या दाम्पत्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सवाद्य मिरवणुकीनंतर पालखी आयको जवळील मलकारसिद्ध मंदिरात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उत्तम पाटील यांनी, मानकापूरगावाचे जागृत देवस्थान श्री मलका रसिद्ध देवाची मोठी महिमा आहे. पवित्र सण असलेल्या महाशिवरात्री दिवशी या देवाची यात्रा भरविण्यात येते. संस्कृती व धार्मिक परंपरेला साज देणारी ही यात्रा म्हणजेच अध्यात्म आणि भक्तीचा संगम असल्याचे मत व्यक्त केले.
सोळळ्यास माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे, माजी अध्यक्षा रूपाली चौगुले, वैशाली कुंभार, अलका चौगुले, विलास माने, जयश्री पुजारी, धनंजय माळी, राजू कुंभार, प्रमोद शेवाळे, संदीप बन्ने, यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल म्हाकाळे, महावीर करवते, जयपाल चौगुले, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह गावकामगार पाटील यात्रा कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व भाविक उपस्थित होते.


Belgaum Varta Belgaum Varta