Tuesday , March 3 2026
Breaking News

शिरगुप्पी रस्त्यावरील उड्डाणपूलासाठी नागरिक आक्रमक

Spread the love

 

प्रस्तावित बदलांना विरोध; सुरक्षित सुरक्षित वाहतुकीसाठी उड्डाणपूल अपेक्षित

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शिरगुप्पी येथील रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपूल शिरगुप्पी रस्त्याकडून सरळ करण्यात यावा, या मागणीसाठी डोंगरी ग्रामीण भागातील शिरगुप्पी, पांगिरे-बी, अर्जुनी, बुदलमुख, गोंदुगुप्पी व शेंडुर तसेच राष्ट्रीय महामार्ग पलीकडील ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेता सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतुकीसाठी सरळ ब्रिज उभारण्याची मागणी यावेळी ठामपणे करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे व एस एम औताडे कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील व विजय दाइंगडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. प्रस्तावित बदलांमुळे नागरिकांना फेरा मारावा लागणार असून अपघाताचा धोका वाढू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सर्व ग्रामस्थांच्या हिताचा विचार करून शिरगुप्पी रस्त्याकडून सरळ उड्डाणपूल मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात नगरपालिकेचे माजी नगरसेवक, डोंगरी भागातील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच विविध गावांतील मान्यवरआणि नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
——————————————————————-
पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर
शिरगुपी रोड ते निपाणी सरळ उड्डाणपूल होण्यासाठी पाच महिन्यापासून सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन हायवे अधिकाऱ्यांना निवेदन देऊनप्रश्न मार्गी लागला होता. दरम्यान खरी कॉर्नर उड्डाण पुलाचे काम युद्ध पातळीवर चालू होते. अचानक काम थांबल्याने सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *