
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; बोरगाव संघामध्ये धान्य वितरणाचा प्रारंभ
निपाणी (वार्ता)सर्वसामान्य कुटुंबीयांना शुद्ध आणि सात्विक अन्न मिळावे,या उद्देशाने राज्यातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने अन्नभाग्य योजना प्रभावीपणे राबवली आहे. पंचहमी योजनमुळे अनेकांचे जीवन सुखकार झाले आहे. आता लवकरच इंदिरा किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचे वितरण लाभाथ्यर्थ्यांना सरकार करणार असल्याचे बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी सांगितले. बोरगाव येथील बोरगाव पूर्व भाग प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या धान्य वितरण प्रारंभ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले होते.
माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर-पवार, सुभाष उर्फ दाजी पाटील, बाबासाहेब पाटील के. बी. वसवाडे, सुरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतलक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते धान्य केंद्राचे उद्घाटन झाले. चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आण्णासाहेब हावले यांनी, शेतकरी व सभासदांच्या हितासाठी संस्थेची स्थापना केली आली आहे. पीक कर्ज देवून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. आता संस्थेच्या माध्यमातून कर्नाटक सरकारकडून मिळणारे अन्नभाग योजनेतील धान्य व इतर सुविधा देण्यासाठीकटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास एस. एम. माळी, विद्याधर अम्मन्नावर, शंकर माळी, अशोक पाटील, प्रकाश पाटील, अनुज हावले, नगरसेवक रोहित पाटील, शिवाप्पा माळगे, भाऊसाब पाटील, पोपट पाटील, सुनील पाटील, विजयकुमार शिंगे, आण्णासो पाटील, संजय हवले, अण्णासाहेब मालगावे, सिद्धार्थ हावले यांच्यासह संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. राजू खिचडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta