
प्रवाशातून संताप ; निपाणी आगार दुजाभाव करत असल्याचा आरोप
निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र आणि कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून निपाणी आगाराची ओळख आहे. पण त्या ठिकाणी कर्नाटकासह महाराष्ट्रातील प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था असल्याने बसची वाट पहात प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागते. महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना आसन व्यवस्थाच नसल्याने त्यांना उन्हाळा आणि पावसाळ्यात प्लॅटफॉर्मरच उभे राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन येथे कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून हायटेक बस स्थानक बांधले आहे. पण सर्वच प्रवासासाठी आसन व्यवस्था नसल्याने बहुतांश प्रवासी बसची वाट पाहत ताटकळत उभे राहत आहेत. बस स्थानकातील चिक्कोडी येथील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी असते. त्याच्या शेजारीच महाराष्ट्रातील गडहिंग्लज, मुरगुड, मुधोळतिट्टा, गारगोटी, सेनापती कापशी, हमिदवाडा परिसरात जाणाऱ्या महाराष्ट्रातील बस थांबतात. पण या प्रवाशांसाठी आसन व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. याबाबत महाराष्ट्रातील प्रवाशांनी बऱ्याचदा आगारप्रमुखांकडे आसन व्यवस्थेची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तात्काळ आसन व्यवस्था न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
—————————————————————-
‘निपाणी हे शहर बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेजारीच असलेल्या महाराष्ट्रातील ग्राहक व प्रवाशांची गर्दी असते. पण त्यांच्यासाठी असं व्यवस्थेची कमतरता असल्याने बसची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर थांबावे लागत आहे. तरी निपाणी आगाराने तात्काळ दखल घेऊन आसन व्यवस्था करावी’
-रमेश मोरे, प्रवासी, मुरगुड
Belgaum Varta Belgaum Varta