
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील निसर्गराजा ग्रुपतर्फे शिवजयंती व जागतिक महिला दिनानिमित्त सलग २१ व्या वर्षी प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा मलकारसिध्द मंदिरात पार पडला. अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त डीवायएसपी नारायण मोठे-देसाई तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते एन. डी. चौगुले, मदन पलंगे, संभाजी साबळे, अभिनेत्री गीतांजली डोंबे,पूनम चौगुले, ॲड. बाबासाहेब निकम, संजय मुळे, डॉ. सुषमा पुजारी उपस्थित होत्या.
प्रारंभी नंदिनीताई कदम यांनी स्वागत तर शिवाजी येडवान यांनी प्रस्ताविक केले.
लावणी सम्राट संदिप वारे यांच्या लावणीचे सादरीकरण झाले.पुरस्कार प्राप्त व निमंत्रित कवींच्या संमेलन प्रसंगी कविता वाचन व भक्ती गीत गायन झाले.
यावेळी केशव पेटकर (महाराज), संदिप वानरे, डॉ. पूर्वा पुजारी, ज्योती दंडवते, छाया धनवडे, शाहीर सागर माने, शाहीर नवनाथ माने, पुनम सुळगावकर, तेजस्वी रेडेकर, विलास कांबळे, बाळासो मोहिते, संदीप देशमुख, निखिल चव्हाण, विठ्ठल जावळे, माधुरी पाटील, सुनिल माने, बाळासाहेब खोत, सुप्रिया पाटील, पूजा भोसले, कल्याणी भोसले आणि नंदा यादव यांना प्रेरण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
प्रा. प्रमोदिनी माने, वंदना भंडारे, सिद्दाप्पा गावडे, रमेशकुमार मिठारे, मुकुंदराव कुलकर्णी, सुधीर पाटील, राजेंद्र कांबळे, सिध्देश पाटील, लालचंद पारीख यांच्यासह निसर्गराजा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. साताप्पा सुतार यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल काटकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta