Tuesday , March 3 2026
Breaking News

लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने भिकाजी कांबळे यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सुळगाव येथील गायक भिकाजी कांबळे यांनी संविधान प्रास्ताविकेचे अठरा भाषांत गायन केले आहे. त्यांच्या या गायनाची दखल घेऊन लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद झाली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथील अरिहंत परिवारातर्फे त्यांचा सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बौद्ध उपासक भिकाजी कांबळे यांनी पुणे (पिंपरी-चिंचवड) येथे आयोजित संविधानाच्या प्रास्ताविकेच्या १८ भाषांमधील सामूहिक गायन कार्यक्रमात कन्नड भाषेतून प्रभावी सादरीकरण करून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत‌ लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यशाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. भिकाजी कांबळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निवृत्त प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, निपाणी भू-न्याय मंडळ सदस्य योगेश दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते सुरज राठोड, राहुल मेस्त्री, कोल्हापूर येथील रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कांबळे, ओंकार कांबळे, बबलू कांबळे, रमेश कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *