Tuesday , March 3 2026
Breaking News

सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल ओंकारश्वरी पाटील यांचा निपाणीत सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सी.ए. परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत येथील माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील आणि हालशुगर संचालिका गीता पाटील यांची कन्या ओंकारेश्वरी उर्फ दक्षा सुनील पाटील हिने यश संपादन केले. त्याबद्दल तिचा महादेव मंदिरात महादेव यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने सत्कार
करण्यात आला.
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया अर्थात आयसीएसआय डिसेंबर महिन्यात प्रोफेशनल आणि एक्झिक्यूटिव्ह अशा दोन विभागात या परीक्षेत झाल्या होत्या. त्याचा निकाल जाहीर झाला असून देशातील सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील केवळ मोजक्याच विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यात ओंकारेश्वरी पाटील यांचा समावेश असल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ओंकारेश्वरी पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निपाणीतील केएलई सीबीएसई स्कूलमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण बेळगाव येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झाले आहे. या सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास सुनिल पाटील, महेश बागेवाडी, अमर बागेवाडी, रविंद्र शेट्टी, रविंद्र कोठीवाले, मल्लिकार्जुन गडकरी, रावसाहेब वसेदार, चिंतामणी वाळवे, गणेश खडेद, सागर भोसले, डॉ. महेश ऐनापूरे, संजय मोळवाडे, अनिल पाटील, चंद्रकांत चौगुले, रविंद्र चंद्रकुडे, अमोल चंद्रकुडे, बाबू साजन्नावर, आनंद पणदे, सुकूमार गुवज्वरावसाहेब पाटील, सोमशेखर कोठीवाले, राजशेखर कोठीवाले, सुधीर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इरण्णा शिरगावे यांनी सूत्रसंचालन केले. मारूती कुन्नूरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *