Wednesday , March 4 2026
Breaking News

बोरगावमधील हावले कुटुंबीयांचे आधारवड नरसू हावले यांचे निधन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, श्री. सिद्धेश्वर क्रेडिट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी जिल्हा पंचायत सदस्य, चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांचे वडील नरसू अण्णाप्पा हावले (वय ८६) यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. मनमिळाऊ असलेल्या हावले यांच्या निधनामुळे बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हावले कुटुंबीयांचे आधारवड असलेल्या धो नरसू हावले यांनी अत्यंत कष्टातून संसार चालवत होते. संघर्षमय जीवनात त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण आणि संस्कार दिले. जीवनात अनेक आव्हाने पेलून पत्नी अक्काताई हावले यांची साथ व स्वतःवर असलेल्या विश्वासामुळे संसाराचा गाडा चालविला. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे पणतवंडे असा मोठा परिवार आहे.
बुधवारी (ता.४) सकाळी ८.३० वाजता बोरगाव शहराती विविध मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव अण्णासाहेब हावले यांनी भडाग्नी दिली.
अंत्ययात्रेत माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, माजी तालुका पंचायत अध्यक्ष जयकुमार खोत, शिरोळ दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील, सदलगा येथील अरुण देसाई, शेतकरी नेते सुनील पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, बोरगाव अर्बनचे चेअरमन टी. आर. पाटील, ढोणेवाडीचे शिवाजी माळी, डॉ. राजेश चिपरे, डॉ. श्रेनिल अम्मन्नावर, राजू खिचडे, अण्णा पाटील, नगरसेवक राजू मगदूम, राजेंद्र पाटील, मनोजकुमार पाटील, महावीर पाटील, अशोक पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुवारी‌(ता.५) रोजी सकाळी ८ वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *