Wednesday , March 4 2026
Breaking News

बुडा अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने लक्ष्मणराव चिंगळे यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी‌ (वार्ता) : चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना बुडाच्या अध्यक्षपदासाठी मुदत वाढ मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचा माजी नगरसेवक संघटनेमार्फत त्यांचा येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला.
चिंगळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सिद्धरामय्या सरकारने जनतेच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. काँग्रेसचा सैनिक म्हणून आपण निपाणी मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शासनाच्या विविध योजना निपाणी मतदारसंघात राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.माजी सभापती किरण कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे सदस्य राजेश कदम, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, चंद्रकांत जासुद, गजेंद्र पोळ, माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, माझी सभापती बबन घाटगे, विश्वास पाटील, माजी नगरसेवक सुभाष कांबळे, धनाजी निर्मळे, मुकुंद रावण, दिलीप जाधव, संदीप चावरेकर, बबन चौगुले, शशिकांत चडचाळे, रवी श्रीखंडे, अरुण आवळेकर, दीपक ढणाल, अशोक लाखे, सुरेश गाडीवड्डर, दीपक सावंत, किसन दावणे, प्रकाश पोटजाळे, प्रवीण हेगडे, प्रथमेश जासूद, शंकर सोनटक्के, तुषार चव्हाण, पिंटू कमते, शिवराज चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवक संघटू पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *