निपाणी भागात विविध कामांचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून लोकसभा निवडणुकीत निवडून दिले आहे. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली निपाणी मतदारसंघात विकासगंगा पोहोचवण्याचे कार्य करीत आहोत. मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून दळणवळणासह विकासकामे राबविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या पुढील काळातही नागरिकांनी आपल्या पाठीशी राहून गावागावातील समस्या मांडल्यास त्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासनखासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केले.

निपाणी मतदारसंघातील १२ गावामध्ये शनिवारी (ता.७) रस्त्यासह विविध कामांचा प्रारंभ करून त्या बोलत होत्या. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, महिला काँग्रेसच्या सुप्रिया पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
खासदार प्रियांका जारकिहोळी प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एससीपीटीएसपी फंडातून निपाणी मतदारसंघातील १२ गावांना रस्ता कामांसाठी २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या कामाचा प्रारंभ करून आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
१२ गावांमधील मागासवर्गीय कॉलनीमध्ये सीसी रस्ताकामे केली होणार आहेत. शनिवारी तवंदी, यरनाळ, शिरगुप्पी, हदनाळ, सुळगाव, कोगनोळी, कुन्नूर, बेनाडी, सौंदलगा, भिवशी, हुन्नरगी आणि बेडकिहाळ येथे रस्ताकामांचा प्रारंभ करण्यात आला. लक्ष्मणराव चिंगळे यांनी, ग्रामीण भागातील रस्ते महत्त्वाचे असून त्या चांगल्या दर्जाच्या करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना दिल्याचे सांगितले.
यावेळी एल. जी. हजारे, किरण रजपूत, पांडुरंग रंगसुभे, अरुण जाधव, प्रकाश ढापळे, राजेंद्र बुवा, रावसाहेब गुरव, विवेक मोकाशी, माजी ग्रामपंचायत संजय पाटील, राजेंद्र गुरव, संगीता पाटील, संतोष पाटील, जालिंदर पाटील, दिवाकर पाटील बाबासाहेब पाटील, बापू गणेश सावरकर, अभिजीत मोहिते, सदाशिव लकडे, सुभाष ऐवाळे, किसन देसाई, नेताजी पोवार यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta