Sunday , March 8 2026
Breaking News

जारकीहोळी, जोल्ले दाम्पत्यांच्यामुळेच शादी महलसाठी निधी

Spread the love

 

मुस्लिम समाज अध्यक्ष फिरोज अफराज ; इतरांनी विकास कामाचे श्रेय घेऊ नये

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शादी महल बांधकामास पालकमंत्री सतीश जारकीहोळी बंधूसह माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले दाम्पत्यांच्या प्रयत्नामुळेच १ कोटीचा भरीव निधी मिळाला असल्याची माहिती बोरगाव मुस्लिम समाज आणि भाजपा अध्यक्ष फिरोज अफराज यांनी दिली. या निधीसाठी आपण स्वतः साक्षीदार असल्याचेही ठामपणे सांगून केलेल्या कामांचे इतरांनी श्रेय घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
अफराज म्हणाले, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी सूत्रसंचालन काही महिन्यांपूर्वी आपल्याकडून शादी महल जागेच्या उताऱ्याची मागणी केली असता, आपण स्वतःहून बोरगाव येथील मुस्लिम समाजाच्या शादीमहल अध्यक्षांकडून जागेचा उतारा घेऊन दिला आहे. त्यासोबत अन्य कागदपत्रे सुद्धा बेंगलोर दरबारी कामासाठी गेलेल्या नगरसेवक शरदरश जंगटे यांना पाठविली होती. त्यानंतर सदरची कागदपत्रे घेऊन आमदार शशिकला जोल्ले यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी शादी महल बांधकामास निधी मंजुरीच्या मागणीस पत्र पाठविले असता त्याला पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अनुमोदन देत ११ फेब्रुवारी २०२६ रोजी या कामास मंजुरी देण्यास अल्पसंख्यांक मंत्री जमीर अहमद यांना शिफारस केली. शादी महल बांधकामाच्या १ कोटी निधीस नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पण काही लोकांनी सदरचा निधी हा आपणच केल्याचे भासवून जनमाणसात दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे सदरच्या अफवांवर विश्वास न ठेवता मंजूर झालेला निधी हा केवळ जारकीहोळी बंधू, जोल्ले दाम्पत्यानीच केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक शरद जंगटे, बी. के. महाजन, अजित तेरदाळे, जहांगीर शेख, शब्बीर मुजावर, इलाई कापसे, राजू नदाफ, सुलतान चोकावे, सलमान जमादार, आयुब मकानदार, जितू पाटील, सचिन कोळी, शंकर गुरव, भरत कांबळे, किसन गोसावी, अमोल पाटील, सागर आलासे, राजु लटलटे, संजू महाजन, भूपाल महाजन, राजू कुंभार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री १००८ भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ मूर्तीचा स्तवनिधीमध्ये रविवारी प्रतिष्ठापना सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : श्री. बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *