कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील जवान नवनाथ आप्पा दिवटे यांचा सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. जवान नवनाथ यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली.
जवान नवनाथ हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले होते.
नवनाथ हे कायम हसतमुख असल्याने त्यांचा गावांमध्ये मोठा मित्रपरिवार देखील आहे. निधनाच्या बातमीने गावावर शोककळा पसरली असून गावात सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
जवान नवनाथ हे सध्या तमिळनाडू येथे सीआयएसएफ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत होते. सन 2009 साली सेवेला प्रारंभ केला होता. त्यांचे प्रशिक्षण छत्तीसगड येथे झाले.
सोमवार तारीख 7 रोजी उत्तर प्रदेश येथे निवडणूक कार्यात सेवा बजावत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta