Monday , March 16 2026
Breaking News

सासरच्या जाचाला कंटाळून कुन्नूरमधील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुन्नूर (ता. निपाणी) येथे शनिवारी रात्री (ता.१४) उघडकीस आली. प्रेरणा सौदागर जिरगे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येबाबतची माहिती मयत प्रेरणा जिरगे हिचे वडील प्रवीण कृष्णात कांबळे (रा. रांगोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) यांनी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे.
त्यानुसार नुसार पती, सासू व दीर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत प्रेरणा जिरगे हिचा एक वर्षापूर्वी कुन्नूर येथील सौदागर जिरगे यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर चार महिन्यांनी प्रेरणा हिचा पती सौदागर, सासू प्रमिला, व दिर स्वप्निल यांच्याकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. त्यामुळे प्रेरणा हिला त्रास सहन न झाल्याने शनिवारी सायंकाळी पती, सासू व दिर घरात नसल्याचे पाहून ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांसह प्रेरणा हिच्या माहेरकडील मंडळींना देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी तहसीलदार अरुण श्रीखंडे, मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी भेट देऊन पंचनामा करून रविवारी (ता.१५) महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मयत प्रेरणा हिचे माहेर असलेल्या रांगोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार अधिक तपास करीत आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नकार्य आटोपून गावाकडे परततांना दुचाकीवरून पडून कुर्लीतील महिला ठार

Spread the love  निपाणी : कागल महामार्गावरील लक्ष्मी टेकडी ते कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत हुपरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *