Wednesday , March 18 2026
Breaking News

घरे, वाहने, दागिन्यांचे बुकिंग; गुढीपाडव्यामुळे निपाणीत चैतन्य

Spread the love

 

मराठी नववर्षाच्या स्वागताची तयारी

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांसह व्यापाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून येत आहे. वाहने, नवीन घरे तसेच सोने दागिन्यांच्या बुकिंगला प्रतिसाद मिळत आहे.
गुढीपाडव्यादिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकांनी वाहन खरेदीसाठी आगाऊ नोंदणी केली असून दुचाकी व चारचाकी शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. बांधकाम व्यावसायिकांकडेही नवीन घरांच्या बुकिंगसाठी चौकशी सुरू असल्याचे चित्र आहे.
सोने-चांदीच्या दुकानांमध्येही ग्राहक नवीन डिझाइन्स उपलब्ध झाल्याने महिलांमध्ये विशेष उत्साह आहे. घर सजवटीच्या वस्तू, गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य, तोरणे आणि पारंपरिक पोशाखांचीही खरेदी-विक्री होत आहे. बाजारपेठांमध्ये दुकानांची सजावट करण्यात आली असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
——————————————————————–
निपाणी १९३ दुचाकींचे बुकिंग
शहरातील वाहन बाजारात सोमवारपासून उत्साह आहे. बुधवार(ता. १८) पर्यंत शहरातील शोरूम आणि जुन्या वाहन बाजारात १९३ दुचाकी तर २३ इतर चारचाकी वाहनांची आगाऊ बुकिंग झाली आहे. यंदा वाहन बाजारात ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

सिलेंडर पुरवठा सुरळीत पण ग्राहकांची गर्दी

Spread the love  हॉटेल, धाब्यांची कसून चौकशी : कारवाईत राहणार सातत्य निपाणी (वार्ता) : घरगुती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *