Tuesday , March 3 2026
Breaking News

वर्षभर महिलांच्या कर्तृत्व, नेतृत्वाचा सन्मान व्हावा!

Spread the love

नगरसेवक बाळासाहेब देसाई : महिला पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप
निपाणी (वार्ता) : आज असे एकही क्षेत्र नाही की जेथे महिलांनी त्यांच्या यशाची मोहर उमटवलेली नाही. पुरुषाबरोबर सर्वच क्षेत्रात महिला कार्यरत झाल्या आहेत. कुटुंबाची जबाबदारी पेलून पोलीस विभागातील महिला समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केवळ महिला दिनीच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर अशा महिलांच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा मान सन्मान केला गेला पाहिजे. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी निपाणीमधील पोलीस विभागांमधील महिला अधिकाऱ्यासह कर्मचार्‍यांचा सन्मान केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी बाळासाहेब देसाई सरकार व मान्यवरांच्या हस्ते शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसुर यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
उपनिरीक्षक कृष्णावेणी गर्लहोसुर यांनी, सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सध्याच्या एकविसाव्या शतकात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. पण अजूनही मोठमोठ्या शहरांमध्ये महिलांचे शोषण केले जाते. असे प्रकार थांबविण्यासाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत. त्याचा त्याचा वापर करून समाजातील महिलांचे शोषण थांबविण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजातील नागरिक आणि पोलिस यंत्रणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून परस्पर सहकार्य केल्यास समाजातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
यावेळी शरदचंद्र मळगे, मिलिंद मेहता, शैलेन्द्र साळवे, संजय माने, विनोद असोदे, अस्लम मिरशिकारी, मोहसिन बावा, हुसेन सदिवाला, विकास जाधव, विक्की इनामदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *