Tuesday , April 7 2026
Breaking News

चालकाच्या प्रसंगावधानाने ‘बर्निंग बस’चा थरार वाचला

Spread the love

 

सौंदलगा बस स्थानकावरील घटना : प्रवाशांनी मारल्या बसमधून उड्या

निपाणी (वार्ता) : सध्या उन्हाळा सुरू असून या काळात वाहनांना शॉर्टसर्किट व इतर कारणांनी आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच निपाणी आगाराची निपाणी -कुन्नूर ही बस (क्रमांक के.ए.२३-३११) रविवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजता सुमारास सौंदलगा बस स्थानकावर आल्यानंतर इंजिन मधून धूर सुरू झाला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला घेऊन प्रवाशांना सुखरूप वाचवले. केवळ त्यांच्या प्रसंगावधानाने केवळ दैव बलवत्तर म्हणून बस बर्निंगचा थरार वाचला.
याबाबत घटनास्थळावरून अधिक माहिती अशी की, निपाणी -कुन्नूर ही बस सुमारे ३० प्रवासी घेऊन कुन्नुरकडे निघाली होती. सौंदलगा बस स्थानकावर आल्यानंतर घालकाच्या शेजारील मशीन मधून धूर येताच चालकाने बस बंद केली. आगीच्या दुर्घटनेच्या भीतीने महिलासह पुरुष प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या. त्यानंतर चालक आणि वाहकांनी बस दुरुस्त करण्याचा सुमारे अर्धा तास प्रयत्न केला. यावेळी चालकाच्या हाताला भाजल्याने दुखापत झाली आहे. अखेर चालक आणि वाहकांनी अर्धा तास प्रयत्न करून बस सुरू केली. त्यानंतर चालका ऐवजी वाहकांनीच बस मार्गस्थ केल्याने प्रवाशांनी सुटकेचा निस्वास सोडून ही बस कुनुरपर्यंत पोहोचली.
——————————————————————–
आगारात अनेक नादुरुस्त बसेस
निपाणी आगारात नवीन बस आल्या असल्याचे सांगत असले तरी ग्रामीण भागात जुनाट बसेस सोडल्या जात आहेत. त्यामुळे अनेक बस रस्त्यात बंद पडण्यासह इतर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देऊन सुस्थितीतील बस सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

सर्वपक्षीय बैठक घेऊनच हुतात्मा स्मारकाची निर्मिती

Spread the love  माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर‌; हुतात्मा शेतकऱ्यांना निपाणीत अभिवादन निपाणी (वार्ता) : तंबाखू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *