Sunday , July 26 2026
Breaking News

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीने बजावला समन्स

Spread the love

 

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स बजावला आहे. या प्रकरणी त्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका संस्थान या ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. त्यामुळे आता या प्रकरणात त्याच्यावर अनेक आरोप केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटीकडून आता चौकशी होणार आहे. शिवानिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आहेत.
नाशिक महिला पोलिसांचे पथक रुपाली चाकणकरांना समन्स देण्यासाठी पुण्याला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटीकडून शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्याचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. या सर्वांच्या चौकशीदरम्यान नेमकी काय धक्कादायक माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास

Spread the love  पुणे : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, ‘युवक क्रांती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *