निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री. रवळनाथ कोऑप हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) संस्थेतर्फे हत्तरवाट (ता. चिक्कोडी) येथील संस्थेचे सदस किरण कमते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५३ व्या क्रमांकाने उतीर्ण झाले आहेत. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या निपाणी शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळी, संस्थेचे सचिव व विद्यमान निपाणी शाखा सल्लागार व्ही. आर. पाटील यांच्याहस्ते हा सत्कार झाला.
शाखा अध्यक्ष प्रा. कोथळी यांनी, बँकिंग व्यवसायासह स्थापनेपासूनच संस्थेची समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा आहे. तसेच समाजातील जळीतग्रस्त, पुरग्रस्त, अपघातग्रस्त, व्याधीग्रस्त अशा आपदग्रस्त व्यक्तींना मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी संस्थेच्या सर्व शाखांमार्फत मोबाईल बँकिग, सी. बी. एस. मायक्रो एटीएम याव्दारे डिजीटल सेवा दिली जाते. आरटीजीएस एन इ एफ टी लॉकर, वीज बीलभरणा यासह पेन्शनधारक, जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी नॅशनल अटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (नॅच) ही सेवा गंभीर आजारी, वयोवृध्द ग्राहकांना घरपोच सेवा दिली जात असल्याचे सांगितले. यावेळी निपाणी शाखा सल्लागार प्रा. डॉ. प्रविणसिंह शिलेदार, शाखाधिकारी, बसवराज चौगुले यांच्यासह व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta