न्यायाधीश प्रेमा पवार : न्यायालयात महिलादिन
निपाण(वार्ता) : महिलांनी आधुनिक काळातील बदल स्विकारत असतांनाच आपल्या कर्तव्याप्रती जागृत राहिले पाहिजे. महिलांनी भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करीत आपल्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आजप्रत्येक महिलेल्या कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे. समाजात वावरतांना कायद्याची साथ घेवून कार्यरत राहिल्यास निश्चितच महिलांविषयी घडणाऱ्या अप्रिय घटना थांबतील. समाजानेही महिलांचा सन्मान केला पाहिजे, असे मत येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश प्रेमा व्ही. पवार यांनी न्यायालयात आयोजीत महिला दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी न्यायाधीश गिरीष चटली, न्यायाधीश, एस. बी. गंगाधर, वकीस संघाचे अध्यक्ष, ऍड. आर. एम. पाटील, ऍड. आर. एम. सनदी, ऍड. शिवकुमार चौगुले, ऍड. निलेश हत्ती, सरकारी वकील ऍड. रेशमा बुरूड, ऍड. एस. बी. घस्ते, ऍड.अनिता सुर्यवंशी, ऍड. मार्गारेट एस. पी. यांच्यासह वकील, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.