
हॉटेल व्यवसायिकांची मागणी; गॅस वितरकांना दिले निवेदन
निपाणी (वार्ता) : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे १५ दिवसापासून हॉटेल पालकांना व्यवसायिक सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून अनेकांनी हॉटेल बंद केले आहेत. त्याचा अनेक कुटुंबीयांवर परिणाम होत असून हॉटेल व्यवसायिकांना वेळेवर व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी येथील हॉटेल व्यवसायिकांनी बुधवारी (ता.८) येथील इंडेन आणि एचपी गॅस वितरकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यामध्ये होत असलेल्या अनियमिततेमुळे हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. वेळेवर गॅस उपलब्ध न झाल्यामुळे रोजच्या कामकाजात अडथळे येत आहेत. शिवाय ग्राहकांची गैरसोय होण्यासह व्यावसायिकांची प्रतिमा खराब होत आहे.याशिवाय आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. गॅस पुरवठ्याची अशीच परिस्थिती राहिल्यास हॉटेल व्यवसाय उध्वस्त होणार आहे. त्यामुळे व्यवसायावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबे उघड्यावर पडणार आहेत. तरी गॅस वितरकांनी हॉटेल चालकांना वेळेवर व्यवसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शहरातील दोन्ही वितरकांनी यांनी निवेदन स्वीकारून व्यवसाय सेंटरचा सुरळीत पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी दीपक इंगवले, मधुकर खवरे, अरुण खडके, राहुल भाटले, बाळासाहेब जासूद, हर्षा शेट्टी, सुनील सांगावकर, नरेंद्र येजरे, सुहास दुधाने, निहाल सांगावकर, पिंटू बोधले, किशोर सांगावकर, प्रसाद बोरगावे, विक्रांत दबडे, केदार येतेकरी, यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta