Sunday , September 20 2026
Breaking News

देशसेवेतून २२ वर्षानंतर निवृत्त झाल्याने नायक यमाजी पुजारी यांचा नागरी सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : म्हसोबा हिटणी येथील सुपुत्र नायक यमाजी बिवा पुजारी (ईएमई दल) हे भारतीय सैन्यात २२ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचे ग्रामस्थातर्फे स्वागत करुण नागरी सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कुटुंबीयांसह निपाणी नगरपालिकेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर गावी जाऊन ग्रामदैवत म्हसोबा देवाचे दर्शन घेतले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. गावामध्ये ढोल-ताशांचा गजर आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातील मान्यवरांच्या हस्ते पुजारी दाम्पत्यांचा सत्कार सोहळा पार पडला. याशिवाय म्हसोबा मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी ओवाळणी करून स्वागत केले.
सोहळ्यात शिक्षक, ज्येष्ठ माजी सैनिक, आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नायक पुजारी यांचा सत्कार झाला. नायक यमाजी पुजारी यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास बाळू पुजारी, युवराज पाटील, बाळासाहेब पाटील, आप्पा पुजारी, सचिन पुजारी, नारायण दळवी, रमेश तोपारे, सरोज तोपारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *