Sunday , July 26 2026
Breaking News

घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई करणाऱ्यावर कारवाई करा

Spread the love

 

अन्यथा श्रीराम सेनेतर्फे तीव्र आंदोलन; निपाणी उपतहसीलदारांना निवेदन

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही गॅस वितरक आणि पुरवठा कर्मचारी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक लूट होत असून प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम सेना कर्नाटकतर्फे करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी (ता. ८) तहसीलदार कार्यालयात उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, सध्या देशात गॅसचा कोणताही तुटवडा नसताना निपाणी भागात मात्र सिलिंडरसाठी ग्राहकांना ताटकळत ठेवले जात आहे. गॅस एजन्सींचे चालक आणि कर्मचारी संगनमताने टंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे. सिलिंडर उपलब्ध असूनही ते वेळेवर दिले जात नाहीत. टंचाईचा फायदा घेऊन निर्धारित दरापेक्षा जास्त रक्कम उकळली जात आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन गॅस एजन्सींच्या साठ्याची तपासणी करावी. बेकायदेशीररीत्या साठेबाजी करणाऱ्या आणि जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ही लूट तात्काळ न थांबल्यास श्रीराम सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी श्रीराम सेनेचे अमोल चेंडके, बबन निर्मले, विनोद पंडित, लोकेश चौगुले, संदीप जाधव, वैभव भाट, विशाल जाधव, आकाश मल्हाडे, अक्षय वाघेला, प्रशांत घोडके, केशव चेंडके, निंगोंडा पाटील, महेश मठपती यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *