
नगरसेवक दिगंबर कांबळे : उत्तम पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील तसेच अरिहंत उद्योग समूह यांच्याकडून शहरातील दलित समाजाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. वस्तीतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शुद्ध पाणी घटकची निर्मिती केली आहे. युवकांना व्यायामाची आवड व्हावी, यासाठी जिम मंजूर करणे, स्वच्छतेस प्राधान्य, दलित वस्तीमधील वाडी वस्तीत गटार, कूपनलिका, जलकुंभ व्यवस्था यासह अनेक शाश्वत विकास कामांना त्यांच्याकडून प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे दलित वस्तीची प्रगती होत असल्याचे मत नगरसेवक दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केले.
बोरगांव येथील युवा नेते उत्तम पाटील यांची बोरगाव अरिहंत को. ऑप स्पिनिंग मिलच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथील दलित समाजाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात दिगंबर कांबळे बोलत होते.
दिगंबर कांबळे म्हणाले, दलित समाजाचा विकास करण्याबरोबरच समाजातील व्यक्तींना मोठे स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न केल्यानेच समाजातील तीन नगरसेवक नगरपंचायत निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांच्या अंगी असलेल्या समाजहिताची तळमळ व सामाजिक कार्य करण्याची पद्धत सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
युवा नेते उत्तम पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, संचालक मंडळ आणि सभासदांच्या सहकार्यामुळेच निवडणूक बिनविरोध झाली. यासाठी सर्वांचे मनापासून आभारी आहे. दलित समाजाच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असून यापुढेही समाजाच्या सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले. नगरसेवक अभय मगदूम, पिंटू कांबळे, संगीता शिंगे, कारखान्याचे संचालक सागर मधाळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश कुरळे, अमर शिंगे, महादेव कांबळे, भरत कांबळे, सुरेश गोसावी, शिवानंद राजमाने, सुखदेव शिंगे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta