
कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथे विहिरीत पाय घसरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 11 रोजी घडली.
सुनिता शिवाजी पाटील (वय 38) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सुनिता या शेतात भांगलण कामासाठी गेल्या होत्या. पाणी आणण्यासाठी विहिरीत उतरले असता त्यांचा पाय घसरल्याने पाण्यात पडून मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी त्या परत आल्या नसल्याने सोबत असलेल्या महिलांनी जाऊन पाहणी केली. संबंधित नातेवाईकांना सांगितले.
घटनास्थळी तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी पाहणी केली. सुनिता यांच्या पश्चात पती, सासू असा परिवार आहे.
याबाबतचा अधिक तपास निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta