Sunday , September 8 2024
Breaking News

बोरगाव नगरपंचायतीचा 14.23 कोटीचा अर्थसंकल्प सादर!

Spread the love
पंचायत इमारत रस्ते, पाणीपुरवठ्यावर भर : 64 हजाराचे शिलकी अंदाजपत्रक
निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायतीचा सन 2022-23 सालाचा अंतिम सुधारित 14 कोटी 23 लाख, 71हजार 69 रुपयांचा आर्थिक अंदाजपत्रक प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये 64 हजार 625 रुपये शिलकेचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिप, पंचायत नवीन इमारत, उद्यान, घनकचरा प्रकल्पासह मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. गुरुवारी पंचायतीच्या सभागृहात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
तरतूद करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचारी वेतन, जाहिरात, छपाई, नगरसेवकांचे मानधन, पथदीप, घनकचरा प्रकल्प पाणीपुरवठा, उद्यान निर्मिती व मागासवर्गीय कल्याण निधी असे मिळून एकूण 1 कोटी 96 लाख 75 हजार 501 रुपये. पंधरावा वित आयोग, एसएमसी अनुदान, वॉटर स्केअर सिटी, एसएससी मुक्त निधी तसेच इतरे अनुदानातून 8 कोटी 29 लाख 84 हजार 962 व विशेष पावती मधून विविध योजनांसाठी 3 कोटी 97 लाख 10 हजार 606 असे एकूण 14 कोटी 23 लाख 71 हजार 69 रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आला.
 उत्पन्नातून शासनाकडून कर्मचारी येणारे वेतन, एसएससी मुक्त निधी, व्यापारी गाळ्याचे भाडे, इमारत बांधकाम परवानगी, कर, व्यापार परवानगी शुल्क, स्क्रॅप विक्री, पाणीपट्टी व घरफळा विद्युत अनुदान  असे एकूण 02 कोटी 78 लाख 45 हजार 88 रुपये, तसेच 15 वा वित्त आयोग एसएफसी अनुदान, वॉटर स्कॅरसाईटी व इतर उत्पन्नातून 07 कोटी 48 लाख 80 हजार रुपये, विविध वसुली  व योजनेतून 03 कोटी 97 लाख 10 हजार 606 रुपये असे एकूण 14 कोटी 24 लाख 35 हजार 694 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नगरपंचायतीचा 64 हजार 625 रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
15 वा वित्त आयोगातून विविध योजनांसाठी मोठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये विशेष असे पंचायत नवीन इमारतीसाठी 05 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच उद्यान निर्मिती पाणीपुरवठा घनकचरा प्रकल्प, पथदिवे, रस्ते, गटारी, मागासवर्गीय कल्याण विविध कामे हाती घेतली आहेत. स्वच्छता, आरोग्य, बांधकाम विभागासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
सादर अर्थसंकल्पामधून बोरगाव शहराचा विकासाला प्राधान्य देण्यात आलेला आहे. शहरातील नागरिकांनी आपला घर  व पाणी कर भरून शहराच्या विकासाला चालना द्यावी. अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता यासह विविध कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. अधिक महसूल जमा झाल्यास शहराचा विकास झपाट्याने होतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे यावेळी प्रशासकीय अधिकारी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्याधिकारी प्रसन्ना कल्याणशेट्टी, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडीयनकर, डीपी दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, वसुली सहाय्यक जयपाल नेजे, अकाउंट विभागाचे जी. एच. जमाल, विजय चौगुले, निलेश उरणकर यांच्यासह नगरपंचायत अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *