
नगरसेवक बाळासाहेब देसाई : कामामुळे नागरिकांतून समाधान
निपाणी (वार्ता) : नगरोत्थान योजनेतून मंजुर करण्यात आलेल्या अंमलझरी तलावाचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित राहिले होते. मात्र आत्ता सुरू झालेले काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास येथील नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार यांनी व्यक्त केला. ते वॉर्ड नागरिकांच्या वतीने तलावाच्या कामास आंबील, नैवेद्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते काँक्रिटीकरण कामास सुरवात करण्यात आली.
नगरसेवक देसाई म्हणाले, नगरोत्थान योजनेतील ५० लाखाच्या निधीतून सदर काम मागील सभागृहात मंजूर करण्यात आले होते. मात्र ते अद्यापपर्यंत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेंगाळले होते. सदर काम लवकर न सुरू झाल्याने तलावा शेजारून जाणारा प्रमुख मार्ग खचून धोकादायक बनला आहे. या कामाची पूर्तता व्हावी, यासाठी वारंवार नगरपालीका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. प्रसंगी आग्रही भुमिकाही घेण्यात आली होती. त्यानंतर हे काम सुरू झाले असून सदर काम दर्जेदारपणे होवून येथील तलावाचे संरक्षण व उर्जितावस्था मिळवून देण्याचे काम करून पाण्याची समस्या दूर होणार आहेत. वॉर्ड २३ व परिसराच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी आंबेडकर नगर येथील असंख्य महिलांनी आंबील कलश तलाव ठिकाणी सवाद्य मिरवणूकीने आणले. त्यानंतर विधीवत पूजन करण्यात येवून आंबील प्रसादाचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब सरकार यांच्यामुळे वॉर्डात मुलभूत सुविधा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून बाळासाहेब सरकार यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शरद मळगे, विश्वास माळी, संभाजी मुगळे, जयसिंग कांबळे, संजय कुरणे, रफिक मुल्ला, राजू शेख, श्रीकांत माळी, मनिषा शिंदे, गीता कुरणे, लता मुख्तारे, गिता कांबळे, संध्या कांबळे, बीना कांबळे, रेखा पाटील, रमा वाळके, रूपाली लोकरे, कुंदा कांबळे, महादेवी होसूरे, अश्विनी मॅगडे, सुलाबाई माने, सविता कांबळे, बेबी खाडे यांच्यासह महिला व नागरीक उपस्थित होते.