
बी. आर. यादव : कुर्ली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : जीवनात अशक्य असे काहीही नाही. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय मोठे ठेवले पाहिजे. कामाच्या योग्य नियोजनामुळे कोणतेही ध्येय गाठणे शक्य आहे.
यशस्वी लोकांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केला पाहिजे. आज अनेक लोक सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेवून यशस्वी झाले आहेत. गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची जिद्द मनात ठेवून सतत सकारात्मक विचारातून आपले ध्येय गाठावे. आयुष्यात विद्यार्थ्यांने शिष्य बनून राहिल्यास ध्येय सिद्धी होते, असे मत चिक्कोडी येथील नामवंत वकील बी. आर. यादव यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्याकुरली येथील सिद्धेश्वर विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी
मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते.
एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. याप्रसंगी संजय शिंत्रे व मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. केदार मगदूम, श्रुती शित्रे, साक्षी पोटले यांनी मनोगत व्यक्त केले. यावर्षीचे आदर्श विद्यार्थी म्हणून साक्षी पोटले व रोहन मस्कर यांना गौरविण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास साऊंड सिस्टीम भेट दिली.
याप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य अरुण निकाडे, संजय शिंत्रे यांच्यासह विद्यालयाचा सेवक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. टी. एम. यादव यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.